'ते' अंत्यविधीला गेले अन् 'हे' मध्यरात्रीच घरात घुसले...

राजेंद्रकृष्ण कापसे
Thursday, 23 July 2020

नातेवाईकांच्या अंत्यविधीला नगरला गेले अन् इकडे लॉकडाउन सुरु असताना चोरट्यांनी त्यांच्या घरी घरफोडी करुन सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गोऱ्हे बुद्रुक येथे घडली. 

खडकवासला : नातेवाईकांच्या अंत्यविधीला नगरला गेले अन् इकडे लॉकडाउन सुरु असताना चोरट्यांनी त्यांच्या घरी घरफोडी करुन सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गोऱ्हे बुद्रुक येथे घडली. याबाबत, विशाल कापरे यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गोऱ्हे बुद्रुक येथील सावित्रा निवास ए. पी .पेट्रोल पंपाच्या शेजारी राहतात. कापरे नोकरी करतात. त्यांच्या घरातील सर्व लोक हे नातेवाईकाच्या अंत्यविधीकरीता नगर जिल्ह्यातील कर्जतच्या य शितपुर येथे गेले होता. त्यावेळी अनोळखी चोरटयांनी फिर्यादी यांचे घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला.
दोन बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरी करून नेले.

यामध्ये, घरात ठेवलेली रोख रक्कम दोन लाख ३० हजार, दोन तोळे वजनाची ३० हजार रुपयांची सोन्याची साखळी, सहा ग्रॅम वजनाची १० हजारांची सोन्याची अंगठी, १६ हजारांची एक ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, एक ग्रॅम वजनाची १६ हजार रुपयांची एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी, दहा हजार रुपयांचे 1650 मिलीग्रॅम वजनाचे ओम बदाम, १३ हजार रुपयांचे एक ८.९८० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, १ हजार रुपयांची एक मिली ग्रॅम ओम, एक हजार रुपयांचे एक ७२० मिली ग्रॅम वजनाचे बदाम पेंडल चार हजार रुपयांचे २.९०० ग्रॅम वजनाचे कानातले टॉप जोड, सहा हजार रुपयांचे अर्ध्या तोळे वजनाचे कानातील जोड, १५ हजाराचे अर्धा तोळे वजनाच्या दोन अंगठया, दीड हजार रुपयांचे दोन चांदीचे ब्रेसलेट असा दोन लाख ४०, हजार २२० रुपयांचा ऐवज गेला आहे.

नापास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, पास होण्याची संधी आलीये चालून...

(Edited by : sagar diliprao shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at Gorhe Budruk