एनडीएची सुरक्षा व्यवस्था भेदून चंदनाच्या झाडांची चोरी 

Theft of sandalwood trees in the NDA by breaking security arrangements
Theft of sandalwood trees in the NDA by breaking security arrangements
Updated on: 

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) कडक सुरक्षा व्यवस्था भेदून चोरट्यांनी प्रबोधिनीच्या परिसरात असलेल्या आधिकारी निवासस्थानाभोवतीची चंदनाची सात लहान झाडे कापून नेले. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी लष्करातील शिपाई निखिल मेश्राम (वय 29, रा, एनडीए, खडकवासला) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव भीमा : विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी अशी असेल मोफत बससेवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेश्राम यांच्याकडे 'एनडीए'तील अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील बंदोबस्ताची जबाबदारी आहे. एनडीएचा परिसर मोठा असून त्यामध्ये ठिकठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामध्ये मेजर विकास यादव यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये चंदनाची झाडे होती.
गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास यादव यांच्या बंगल्यासह शेजारी असणाऱ्या आणखी एका बंगल्याभोवती असणारी सात लहान आकारची चंदनाची झाडे अनोळखी व्यक्तीनी कापून नेली.


पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद

विशेषतः एनडीएमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ही सुरक्षा व्यवस्था भेदून चोरट्यांकडून एनडीएच्या हद्दीतील झाडे चोरण्याचा प्रकार घडत असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबतच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार काशिनाथ कोल्हे तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Northeast Monsoon 2026 Begins Across South India
Pune district orders a 20% water supply cut as Khadakwasla reservoir storage declines.
Drunk and Drive
Archana Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com