पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?

Claims to have found the remains of a pillar symbolizing the war against the British at talegaon Khind.jpg
Claims to have found the remains of a pillar symbolizing the war against the British at talegaon Khind.jpg

तळेगाव स्टेशन(पुणे) : मुंबई पुणे महामार्गावरील तळेगाव दाभाडे ते सोमाटणेदरम्यानच्या खिंडीबाबतचे ऐतिहासिक अवशेष सापडले आहेत. मराठ्यांनी केलेल्या ब्रिटिशांच्या पाडावाचे प्रतीक म्हणून खिंडीत बांधलेल्या विजयस्तंभाचे हे अवशेष असल्याचा दावा इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी केला आहे.
 
गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 
 

तळेगावच्या शिवेत सोमाटणे बाजूने प्रवेश करताना पुणे-मुंबई महामार्गावर लागणाऱ्या खिंडीला आजवर अनेक नावाने संबोधले जाते. तळेगाव दाभाडेची खिंड, सोमाटणेची खिंड आणि 'नॅशनल हेवी'ची खिंड, मारुती खिंड अशी अनेक नावे काळानुरूप संवादात आल्यामुळे मूळचे ऐतिहासिक प्रचलित 'विजयखिंड हे नाव विस्मृतीत गेले होते.

कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

गेल्या आठवड्यात तळेगावातील काही मंडळी मॉर्निंग वॉकदरम्यान चौराई दर्शनासाठी जात असताना एका झाडाजवळ दगडी अवशेष सापडले. याबाबत दुर्गसंवर्धक सदानंद पिलाणे, संदेश भेगडे, नीलेश गराडे, सचिन ढमाले, किरण पगारे, आदित्य येवले, संकल्प भेगडे यांनी इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांच्याशी संपर्क साधला.

"तुमची लेणी बघायला कुत्रंही येत नाही' असे  म्हणणाऱ्या आढळरावांच्या सोशल मीडियावर निषेध ​
 

बोराडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. संग्रही दस्तावेजातून संदर्भ तपासले असता विजयखिंडीचा इतिहास हाती लागला. सापडलेले अवशेष दगडी असून मध्ययुगीन आहेत. दीपमाळेवरील अतिशय सुंदर नक्षीयुक्त असे ते शिल्प आहे. इतर संदर्भयादी पाहता ते नक्कीच मराठा ब्रिटिश युद्धाच्या समकालीन असावेत, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

9 जानेवारी 1779 रोजी झालेल्या ब्रिटिशांविरोधातील लढाईत महादजी शिंदे आणि बालाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना विजय मिळाला. याचेच प्रतीक म्हणून खिंडीत हनुमानाच्या मूर्ती प्रतिष्ठापना करून त्यास विजय मारुती असे नामकरण करण्यात आले. जे आजही प्रचलित आहे. इतिहासातील प्राथमिक संदर्भ तपासून रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी "मराठा रियासत'मध्ये ही घटना विस्ताराने मांडली आहे. एक विजयस्तंभ पूर्वी येथे बांधला गेल्याची शक्‍यता असून, कालौघात पडझड झाल्याने तो विस्मृतीत गेला असावा. हे भग्नावशेष आता समोर आल्याने येथे मराठ्यांच्या या विजयाचेच स्मारक बांधले असू शकते. 

स्मारक उभारण्याचा संकल्प 
नव्या पिढीला या इतिहासापासून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी या हेतूने यापुढे खिंडीचा विजयखिंड म्हणूनच नामोल्लेख व्हावा. याठिकाणी स्मारकाची पुनर्बांधणी करण्यासाठी पंचक्रोशीतील इतिहासप्रेमी आणि संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लढाईला 240 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 9 जानेवारीला विजयखिंडीचे ऐतिहासिक संदर्भ देणाऱ्या फलकाचे अनावरण करून विजयस्तंभ स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. 
Video : धरणात पाणी असूनही गुरुवारी पुरवठा बंद का? : चंद्रकांत पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com