

Devotees Targeted During Palkhi Yatra in Pune; Three Held for Mobile Theft
esakal
पुणे : शहरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शनिवारी (ता. ११) दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांचे दागिने आणि मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, एका घटनेत पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीला ताब्यात घेतले आहे.