esakal | बारामतीत बुलेट चोरट्यांची धूम
sakal

बोलून बातमी शोधा

motarcycle

बारामती शहरात एकाच दिवशी 3 लाख 10 हजारांच्या तीन बुलेट मोटारसायकल चोरीला गेल्याने पुन्हा मोटारसायकल चोरीचे सत्र सुरु झाल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

बारामतीत बुलेट चोरट्यांची धूम

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे)  : बारामती शहरात एकाच दिवशी 3 लाख 10 हजारांच्या तीन बुलेट मोटारसायकल चोरीला गेल्याने पुन्हा मोटारसायकल चोरीचे सत्र सुरु झाल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरातील कृषी विभागातील कार्यरत शंकर गणपत कांबळे यांची 1 लाख 30 हजारांची बुलेट हँडल लॉक काढून चोरुन नेली. दरम्यान, तालुक्यातील सोनकसवाडी येथील पोलिस पाटील असलेले राजेंद्र शिवाजी राजगुरु यांची एक लाख रुपयांची बुलेट चोरट्यांनी चोरुन नेली. दरम्यान शुभश्री अपार्टमेंटमधून रुपेश सौदागर साबळे यांची 80 हजार रुपयांची मोटारसायकल चोरट्यांनी चोरुन नेली. त्यापैकी दोन बुलेट मोटारसायकल बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या, तर एक बुलेट मोटारसायकल बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महागड्या मोटारसायकली चोरीचे सत्र पुन्हा सुरु झाल्याने बारामतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  मध्यंतरी मोटार सायकल चोरीचे प्रमाण कमी झाले होते. एकाच दिवसात तीन बुलेट सारख्या मोटारसायकली चोरीस गेल्या. त्यामुळे नागरिकात चिंतेचे वातावरण तर आहेच, मात्र अजूनही मोटारसायकल चोरटे काही गाड्यांवर हात साफ करतील, अशी भीती लोकांना वाटत आहे. 

पार्किंगमधूनच गाड्यांची चोरी 
अपार्टमेंटमध्ये घराखाली लावलेली मोटारसायकल जर चोरीला जात असेल, तर मोटारसायकली आणखी सुरक्षित कोठे लावायच्या, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. पोलिसांनी नुकतेच एका मोटारसायकल चोराला अटक करुन त्याच्याकडून मोठ्या संख्येने मोटारसायकली जप्त केल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी आता विविध माध्यमातून मोटारसायकल चोरांचा तपास वेगाने सुरु केला आहे.