उंडवडीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन दवाखान्यांसह मेडिकल फोडले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

दोन दवाखाने व एक मेडिकल दुकानाचा कडीकोयंडा तोडून पाच हजार रुपये व ताप मापक तपासणी यंत्र चोरुन नेले. 

उंडवडी (ता. बारामती) : येथे बुधवारी (ता. 19) रात्री अज्ञात चोरट्यानी दोन दवाखाने व एक मेडिकल दुकानाचा कडीकोयंडा तोडून पाच हजार रुपये व ताप मापक तपासणी यंत्र चोरुन नेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याबाबत मिळलेली माहिती अशी, की येथील डॉ. नितीन काळे यांच्या पार्वती क्लिनिक या दवाखान्याचा दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी आत प्रवेश केला. कपाटातील रोख पाच हजार रुपये आणि ताप मापक तपासणी यंत्र चोरुन नेले. तसेच, डॉ. निलमकुमार शिरकांडे यांच्या दवाखान्याचे शटर उचकटून चोरट्यानी आत प्रवेश केला. तेथूनही दोन ते तीन हजार रुपये लंपास केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, येथील हिवरकर यांच्या मेडिकलचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात पुन्हा चोरट्यांची भीती निर्माण झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft in two clinics and medical in undavadi

Tags
टॉपिकस
Topic Tags: