पुणे : डल्ला'बाज टोळीपासून सावधान; अशी केली जातेय हातचलाखी

Theft is from women in Pimpri chinchwad Pune
Theft is from women in Pimpri chinchwad Pune

पिंपरी : पीएमपी बसने प्रवास करीत असाल तर सावधान..! डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच मोबाईल, पाकीट अशा मौल्यवान वस्तू क्षणार्धात गायब होतात. दिवसभरात बसमध्ये महिला चोरट्यांची टोळी हातचलाखी करून डल्ला मारत आहे. कित्येक दिवसांपासून हे सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड ते पुणे यादरम्यान गर्दीच्या ठिकाणी हे घडते. प्रवाशांना धक्काबुक्की करीत महिला बसमध्ये प्रवेश करतात. दोन ते तीन महिला व दोन पुरुष अशी टोळी लहान मुलांना कडेवर घेऊन महिला प्रवाशांच्या आसपास फिरते. अनेकदा चोरी झाल्यावर हे उघडकीस येते.

फुल विक्रेत्याच्या खात्यात जमा झाले 30 कोटी रुपये; अन्...

अशी होते हातचलाखी...
बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन लुटारू गोंधळ करतात. त्यामुळे प्रवासीही गोंधळून जातात. याचा फायदा उठवून चोरी केली जाते. बॅगची चेन सहज उघडून पाकीट चोरले जाते. कित्येकदा प्रवाशांना भुलीतून गुंगीचे औषधही दिले जाते. काही सुज्ञ प्रवाशांच्या लक्षात चोरीची बाब आल्यानंतर महिला टोळीला विचारणा केली जाते. मात्र, गलिच्छ भाषा व शिवीगाळ करून महिला बसमध्येच प्रवाशांशी वाद घालत आहेत. त्याचक्षणी बसचा पुढील थांबा आला, की घोळक्‍यात महिला चोरी करून पसार होतात. बसच्या शेजारी एखादी रिक्षा उभी असते. महिला टोळी त्या रिक्षात बसून पसार होतात.

मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप

निगडी ते कात्रज, वेळ (दु. 2. 45), 15 एप्रिल 2019
कात्रज येथून सुटलेली गाडी वसंतबाग भापकर पेट्रोल पंपाजवळ 3 वाजून 5 मिनिटांनी आली. वसंतबाग ते इंडियन कार्ड तिकीट कंपनीच्या (तिकीट नं. 1445700-12/3, ) ट्रिप नं. 1 च्या बसमध्ये गर्दी होती. जयश्री बबन बवले या त्याच गाडीत प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान तीन महिला व चार पुरुष गाडीत त्यांना संशयास्पद वाटत होते. तरीही, या महिलांना बवले यांनी बसण्यासाठी दापोडीत सीट रिकामी करून दिली. त्यापूर्वी दांडेकर पुलापासून त्यांना अचानक त्रास होऊ लागला. दापोडीपर्यंत त्यांना गुंगी आल्यासारखे जाणवले. कासारवाडीत उतरल्यानंतर त्यांना समजले, की हातातील सोन्याच्या पाटल्या गहाळ झाल्या आहेत. शेजारी उभ्या असलेल्या महिलांनी हातचलाखी करून 25 ग्रॅमच्या पाटल्या लंपास केल्या होत्या. सराईत महिला चोरट्यांची टोळी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ भोसरी पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदविली.

जगभरात कोरोनाची दहशत, आतापर्यंत एवढ्या जणांचा मृत्यू; तर...

प्रसंग 2, निगडी ते फडके हौद (वेळ दु. 3), 7 मार्च 2019
वसंत दत्तात्रेय येवले हे ज्येष्ठ नागरिक फडके हौद येथे साडेचार वाजता बसमधून उतरले असताना मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित कसबा पेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

प्रसंग 3, कात्रज परमहंसनगर ते डेक्कन कॉर्नर (दु.2. 20), 18 जानेवारी 2020
निशा मसलेकर या प्रवास करीत असताना पर्समधून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, साडेचार तोळ्यांच्या बांगड्या, सोन्याच्या रिंगा व रोख रक्कम तीन हजार रुपये चोरीला गेली. त्यापूर्वी त्यांनी वाहकाला एक महिला विनाकारण बसमध्ये त्रास देत असल्याचे सांगितले होते. बसमधून उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, वाद घालणाऱ्या महिला चोरट्याने दागिने लंपास केले आहेत. 

काश्मीरमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

गर्दीच्या ठिकाणी चोरी झाल्यास त्वरित 100 नंबरच्या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच, बसमध्ये चोरी झाल्यास 020-24545454 या पीएमपीच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा.

"बसमध्ये महिला चोरट्यांची टोळी खूप दिवसांपासून आहे. मात्र, ती हाती लागत नाही. वेगवेगळ्या बसमध्ये या महिला दिवसभर चढउतार करतात. साखळी पद्धतीने चोऱ्या हातोत. हाती लागल्यास त्यांच्याजवळ ऐवजही सापडत नाही. त्यामुळे गुन्हे दाखल करण्यास अडचण निर्माण होते. यामुळे प्रवाशांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.''- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com