थीम बेस्ड कॅफेला तरुणाईची पसंती

सुवर्णा चव्हाण
शनिवार, 19 मे 2018

पुणे  - सॅंडविच, पिझ्झा, बर्गरसोबत ‘एक कप कॉफी तो बनती है...,’ असं म्हणत तरुणाई तासन्‌तास ‘कॅफे’त गप्पांमध्ये रंगते... तरुणाईच्या हॅंगआऊटसाठीचं फेव्हरेट ठिकाण असलेल्या या कॅफेचे रूप पालटत आहे. पूर्वी कॉफी आणि गप्पांपुरते मर्यादित असणाऱ्या कॅफेची जागी आता ‘थीम’वर आधारित ‘स्पेशल कॅफे’ने घेतली आहे. त्याला तरुणांचीही पसंती मिळत आहे. म्युझिक, डान्स या थीमवरील कॅफेसह वारी, आर्ट, बुक, वारली अशा विविध नवीन थीमवर आधारित कॅफे शहरात ठिकठिकाणी निर्माण झाले आहेत. 

एखाद्याला पुस्तक वाचायची आवड असेल, तर तो ‘बुक कॅफे’ला भेट देतो.

एखाद्या ग्रुपला गाण्यांची आवड असेल तर ‘म्युझिक कॅफे’त जातात. नुक्कड, वारी, शिशा, हिंग्लिश, बाइकर्स, वॉल्युम, टेबल टॉक, हार्ड रॉक, ओपन विंडो, क्‍लासिक रॉक अशा विविध थीमवर आधारित कॅफे ठिकठिकाणी आहेत. खासकरून महाविद्यालयीन आणि आयटीतील तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी ही थीम बेस्ड कॅफे तयार झाली आहेत.

या कॅफेमध्ये त्या त्या थीमनुसार इंटेरियर डेकोरेशन करण्यात आल्याचे पाहता येईल.

तरुणाईला चविष्ट खाद्यपदार्थांसह वेगळी कॉफी प्यायला मिळावी, यासाठी थीमवर आधारित कॅफे निर्माण होत आहेत. हे कॅफे तरुणाईच्या हॅंगआउटसाठी फेवरेट ठिकाण आहे.
- सुशांत सरडे, कॅफेचालक

या थीमवर आधारित कॅफेमध्ये चांगले खाद्यपदार्थ मिळतात. त्यांची चवही वेगळी असते. कॉफीमध्ये वेगळेपणा असतो. त्यामुळेच मी आणि माझे मित्र नेहमी अशा विविध कॅफेला भेट देत असतो.
- नीलेश देसाई, आयटी नोकरदार

Web Title: theme besed cafe youth