...म्हणून इथलं गाव कोरोनापासून दूर!

...म्हणून इथलं गाव कोरोनापासून दूर!
Updated on

लोणी काळभोर : उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीतील प्रमुख गावात मागील अडीच महिन्यांपासून कोरोना व्हायरस थैमान घालत असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी सारखे दहा हजार लोकसंख्येचे मोठे गाव मात्र कोरोनापासून अद्याप तरी कोसो दूर आहे. येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्र येऊन घेतलेल्या योग्य खबरदारीमुळे, स्वयंशिस्तीमळे सोरतापवाडी गाव बिनधास्त 'कोरोना फ्री' आयुष्य जगत आहे.

पूर्व हवेलीमधील उरुळी कांचन, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कोरेगाव मूळ, कदमवाकवस्ती सारख्या गावात मागील साठ दिवसांच्या कालावधीत वीसहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोनाग्रस्त रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, सोरतापवाडी व परिसरात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही हे विशेष. सोरतापवाडी ग्रामस्थांनी आपल्या चौकस व स्वयंशिस्त व शासनाने घालुन दिलेल्या नियमांच्या पालणामुळे कोरोनाला आपल्या गावात एन्ट्रीच करु दिलेली नाही. गाव अगदी निर्धास्त आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे-सोलापुर महामार्गावर फुलांचे गाव म्हणुन ओळख असलेल्या सोरतापवाडी गावची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. येथील बहुसंख्य गावकऱ्यांचे उरुळी कांचनसह पुणे शहरात कामानिमित्त येजा असली तरी, स्वयंशिस्त व शासनाने घालुन दिलेल्या नियमांच्या पालणामुळे कोरोनाला गावात येऊ दिलेला नाही. गावकरी सोशन डिस्टसिंगचे नियम पाळण करत असताना दिसुन येत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांनी गावातील प्रत्येक नागरीकांच्या आरोग्याची तपासनी करुन, गावकऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी स्वयंमस्फुर्तीने योग्य ती खबरदारी घेत आहेत. यामुळे दहा हजार गावकरी बिनधास्त आयुष्य जगत आहेत. सोरतापवाडी ग्रामस्थांनी राज्यातील प्रत्येक गावापुढे आपला एक आदर्श निर्माण केला आहे. घऱात रहा, आपण स्वतःला व गावाला सुरक्षित ठेवा, व कोरोनापासुन बचाव करा हा मंत्रच सोरतापवाडी करांनी दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देतांना सरपंच सुदर्शन चौधरी म्हणाले, पुर्व हवेलीत कोरोनाचा पहिला रुग्न आढळुन येताच, ग्रामस्थांची बैठक बोलावून कोरोनाला दुर ठेवण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली होती. ग्रामस्थांनी स्वयंमस्फुर्तीने योग्य ती खबरदारी घेत आजपर्यंत तरी कोरोनाला दूर ठेवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव समजावा यासाठी केंद्र शासनाने तयार केलेले "आरोग्यसेतू ॲप" सोरतापवाडी परीसरातील अडीच हजाराहुन अधिक नागरीकांनी स्वथःच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केले आहे. वरील ऍप डाऊनलोड करण्याबाबत सोरतापवाडी गाव जिल्हातच नव्हे तर संपुर्ण राज्यात अग्रेसर आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक यांच्यामार्फत गावातील वाड्यावस्त्यावर जाऊन आरोग्यसेतू ॲप डाऊनलोड करण्याबाबत व कोरोनाला दूर ठेवण्याबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली जात आहे. तसेच नागरीकांनी आरोग्यसेतू ॲप डाऊनलोड केल्यामुळे काही नागरिकांच्या आरोग्यबाबत समस्या समजल्याने, त्यांच्यावर प्रथमोपचार व पुढील वैदकीय तपासणीसाठीच्या सुचना देता आल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान कोरोनाला गावापासुन दुर ठेवण्यासाठी ग्रामस्थांच्या बरोबरच, माजी सरपंच सागर चौधरी, उपसरपंच भाऊसाहेब चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौधरी, सुनिता कड, स्वाती चोरघे, भारती चौधरी, अलका चौधरी, सहदेव सावंत, संजय जगताप, चंद्रकांत चौधरी, बापूसाहेब वाल्हेकर यांनी मोलाची मदत केल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com