esakal | धनंजय मुंडेंसमवेत विसंवाद नाही : पंकजा मुंडे 
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja-Maunde

सामान्य व्यक्‍तींच्या हिताच्या विषयांवर एकत्रित येऊन काम करण्यास हरकत नाही. धनंजय मुंडे रुग्णालयात होते, त्यावेळीही मी त्यांच्याशी चर्चा केली. अशा सुख-दु:खाच्या प्रसंगी विसंवाद असण्याचे कारण नाही, अशा भावना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्‍त केल्या.

धनंजय मुंडेंसमवेत विसंवाद नाही : पंकजा मुंडे 

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे - सामान्य व्यक्‍तींच्या हिताच्या विषयांवर एकत्रित येऊन काम करण्यास हरकत नाही. धनंजय मुंडे रुग्णालयात होते, त्यावेळीही मी त्यांच्याशी चर्चा केली. अशा सुख-दु:खाच्या प्रसंगी विसंवाद असण्याचे कारण नाही, अशा भावना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्‍त केल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बीड जिल्ह्यातील राजकारणात पंकजा आणि राष्टवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे या बहीण-भावात संघर्ष पाहायला मिळाला. परळीच्या विधानसभा निवडणुकीत संघर्ष विकोपाला पोचला होता. परंतु पुण्यात मंगळवारी ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नांबाबत आयोजित बैठकीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात संवाद पाहण्यास मिळाला. या संदर्भात विचारले असता मुंडे यांनी वैयक्‍तिक विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले.

पुणे महापालिकेतील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सुरेश जगतापांकडे 

भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे धस यांनी "व्हीएसआय'च्या प्रवेशद्वारावर आंदोलन करीत बीड येथील नेत्यांच्या दबावामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला होता. या संदर्भात मुंडे म्हणाल्या, जे निमंत्रणाच्या यादीत होते ते सर्व नेते बैठकीस हजर होते. त्यांनी माझे नाव घेऊन आरोप केलेले नाहीत. मी दबाव टाकण्याचे कारण नाही. खरे ऊसतोड कामगार, मुकादम माझ्यासोबत आहेत. परंतु मी ऊसतोड कामगारांचे नेतृत्त्व निर्विवादपणे करीत आहे. त्यात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. आजच्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये अपेक्षेनुसार वाढ नाही पण आपण समाधानी आहोत.

कनेक्‍टिंग विमानांची गैरसोय झाल्यास प्रवासाचा वेळ वाढणार

तर पुन्हा उसाच्या फडात आंदोलन : सुरेश धस 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ऊसतोड कामगारांबाबत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. परंतु त्यांनी 85 टक्के पेक्षा कमी वाढ देऊ नये. तसेच, येत्या अधिवेशनात विधेयक आणून ते पारित करावे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. ऊसतोड मजुरांना 85 टक्के वाढ न मिळाल्यास दोन महिन्यानंतर उसाच्या फडात पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल. तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे धस यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil