समाजात हिंदुत्व नावाचा दहशतवाद फोफावत आहे : नयनतारा सहगल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : ''समाजातील धर्मनिरपेक्षता धोक्यात असून हिंदुत्व नावाचा दहशतवाद फोफावत आहे. समाजात हिंदू आणि इतर अशी फूट पडली आहे.'' , अशी थेट टिका ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी केली. 

पुणे : ''समाजातील धर्मनिरपेक्षता धोक्यात असून हिंदुत्व नावाचा दहशतवाद फोफावत आहे. समाजात हिंदू आणि इतर अशी फूट पडली आहे.'' , अशी थेट टिका ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी केली. 

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन आयोजित भाई वैद्य स्मृति गौरव पुरस्कार सहगल यांना जाहीर झाला. त्यांच्यावतीने लेखक किरण नगरकर यांनी तो स्वीकारला. यावेळी व्हिडीओद्वारे सहगल यांनी संवाद साधला. ‘‘शालेय पुस्तकांमधील इतिहास सोयीप्रमाणे बदलत आहे. जो सरकारच्याविरोधात जाईल त्याला देशद्रोही ठरवत आहेत.’’ अशी खंत सहगल यांनी व्यक्त केली.  

किरण नगरकर यांनीही समाजावर भाष्य केले, ‘‘ राज्यकर्त्यांनी पुतळे उभे करण्याऐवजी भरीव कामं करायला हवी. महान लोकांनांही कामगिरी हवी आहे, पुतळे नको.’’ यावेळी कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a terrorism called Hindutva in the society: Nayantara Sehgal