पुण्यातील 'या' भागात उद्यापासून होणार वाहतुकीत मोठा बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

- उद्यापासून वाहतुकीत होणार मोठा बदल.

पुणे : मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्यामुळे कर्वे रस्त्यावरील दुचाकी वाहनांसाठीच्या पुलाजवळील (यशवंतराव चव्हाण चौक) वाहतूक व्यवस्थेत बुधवारपासून (ता. 8) 20 जानेवारीपर्यंत बदल होणार असल्याचे महामेट्रोने कळविले आहे. त्याची नोंद वाहनचालकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दुचाकीच्या पुलाजवळील चौकात मेट्रो मार्गासाठी उभारण्यात आलेल्या खांबावर सेगमेंट जोडण्याचे काम बुधवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार पुना हॉस्पिटलकडून दुचाकी वाहनांच्या पुलावरून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांना आयुर्वेद रसशाळा चौकातून 'यू टर्न' करून डेक्कनकडे जाता येईल.

तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा प्रयोग!

तसेच नळस्टॉपकडून पुना हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनांना शेलार मामा चौकातून "यू टर्न' करून पुना हॉस्पिटलकडे जाता येईल, असे महामेट्रोतील अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अजयकुमार यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there will Changes in Traffic from Tomorrow

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: