कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे विधी कसे पार पडतात; वाचा सविस्तर 

co.jpg
co.jpg
Updated on

महर्षीनगर : समाजाप्रती चांगली भावना असेल तर कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची वृत्ती बळावते. जन्माने अपंग असणारे जमीर मोमीन यांनीही या काळात कोरोना मृतदेहांचा अंत्यविधी करण्यास मदत केली ती कशी केली जाणून घेऊयात त्यांच्या तोंडून. 

अंजूम इनामदार, साबिर सय्यद, आमजद शेख, साबिर तोफखाना, दानिश खान, सलिम शेख, मोहम्मद हानिफ खान, अझहर सय्यद सोबतीला होते. या टीमने गेल्या तीन महिन्यात १०० हुन अधिक कोरोना मृतदेहांचे विधी पार पाडले. मोजक्या लोकांत विधी पार पाडण्याची ही वेळ दुर्दैवाने कोरोनामुळे अनेक कुटुंबावर आली, या दरम्यान काळात अनेक अनुभव आल्याचे मोमीन सांगतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मोमीन यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ''सुरुवातीच्या कठीण काळात नागरिकांमध्ये जी भीती निर्माण झाली होती ती दूर करण्यासाठी आम्ही आमचं मनोबल वाढविण्याचे ठरवले आणि कोणत्याही परिस्थितीत मनोबल कमी होणार नाही याची काळजी घेतली त्यामुळे आम्ही सतत आमच्या जवळच्या मित्रांशी दूरध्वनीवरून मनमोकळ्या गप्पा मारत असे. कधी कधी रात्री अपरात्री जावं लागत होते. सध्या नागरिकांमधील भीती बऱ्यापैकी  गेली असली तरी धोका अजूनही टळलेला नाही. विशेषतः जेष्ठ आणि लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक केले हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, सर्वांनी या नियमांचं पालन करायला हवे.'' 

अंब्युलन्स चालक साबीर सय्यद म्हणतात, ''कोरोनाचा रुग्ण दगावल्याची माहिती मिळताच आमची टीम काही वेळात इस्पितळात  दाखल होते. वाहन चालवताना मानसिकरित्या कणखर असणंदेखील महत्वाचं असतं. घरी विलगीकरणात असताना फोन येत तेव्हा कुटुंबात सुद्धा भीतीचं वातावरण सुरुवातीला निर्माण होत असे परंतु कौटुंबिक प्रबोधन केल्यानंतर योग्य उपाययोजना करून आम्ही त्यांच्या मानसिकतेत बदल घडवला.

अंजुम इनामदार यांनी या कामासाठी पुढाकार घेऊन कागदोपत्री सर्व पाठपुरावा केला आणि पुणे महापालिकेकडून पीपीई किट मिळवले. एकिकडे कौटुंबिक जबाबदारी पेलत असताना दुसरीकडे सामाजिक भान जपत अशीही सेवा देत आहेत. या सर्व योद्ध्यांचे शहरभरातून कौतुक होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com