

Nine Two-Wheelers Crushed in Theur Truck Accident
Sakal
सुनील जगताप
थेऊर : थेऊर - कोलवडी रस्त्यावर ट्रकने ९ दुचाकींना धडक दिल्याची घटना थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळ बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु,९ दुचाकींचा चक्काचूर झाला आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम संतराम वरपे (वय २५,रा.कोरडेवाडी, जि.बीड)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.याप्रकरणी अजय मनोहर पवार (वय ३३,रा.थेऊर,ता.हवेली जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.