नारायणगाव : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; सराईत चोरट्यास केले जेरबंद

  रवींद्र पाटे
Sunday, 10 January 2021

ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिश्यामध्ये तीन मोबाइल सापडले. मोबाइल व सोन्याचे मंगळसूत्र त्याने  नारायणगाव येथील वाजगे आळी येथून चोरल्याची कबुली दिली.

नारायणगाव : नारायणगाव, जुन्नर, घोडेगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला व सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सागर मनोज विटकर (वय २६, रा. नारायणगाव, वाजगे आळी) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे येथील बसस्थानकात अटक केली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सागर विटकर याच्यावर नारायणगाव (सन २०२०), जुन्नर( सन २०१४), घोडेगाव (सन २०१४) पोलिस ठाण्यात घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत. मागील सहा वर्षापासून विटकर पोलिस रेकॉर्डवर होता. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज जुन्नर भागात रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करत असताना मनोज विटकर हा नारायणगाव बस स्थानकात  संशयितरित्या फिरताना आढळला.

ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिश्यामध्ये तीन मोबाइल सापडले. मोबाइल व सोन्याचे मंगळसूत्र त्याने  नारायणगाव येथील वाजगे आळी येथून चोरल्याची कबुली दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस हवालदार विक्रम तापकीर, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, हनुमंत पासलकर या पथकाने केली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief arrested at Narayangaon