वाघोली - चोरीच्या उद्देशाने भंगार दुकानात घुसलेल्या तिघांना कामगारांनी केलेल्या बेदम मारहाणीमध्ये एका चोरट्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना सोमवारी पहाटे वडगावशेरी येथील पंतनगरमधील एपीके ट्रेडर्स भंगार दुकानात घडली. या प्रकरणी दुकानमालकासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.