नसरापूर - मंदिरात दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेला तुमच्या हस्ते मंदिरात माझी दक्षिणा ठेवा, असे म्हणून रोख पैसे दिले व विश्वास संपादन केला. महिलेस दुसऱ्या मंदिरात दुचाकीवर घेऊन जाऊन तिथे गेल्यावर तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व हातातील अंगठी लंपास करून गुरुवारी (ता. २४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चोरटा पसार झाला. मात्र, चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.