esakal | सोने, हिरे-मोत्याचे दागिने, दीडशे डॉलर अन् अकरा लाख; कर्वेनगरमधून चोरट्यानं लंपास केलं हो!
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Thief

फिर्यादी नारखेडे हे 18 नोव्हेंबरला त्यांच्या आणि मित्राच्या कुटुंबीयांसह बाहेरगावी सहलीसाठी गेले होते. त्यांनी जाताना घराची एक चावी त्यांच्याकडे दहा वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीकडे दिली होती.

सोने, हिरे-मोत्याचे दागिने, दीडशे डॉलर अन् अकरा लाख; कर्वेनगरमधून चोरट्यानं लंपास केलं हो!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवाळीनंतर सहलीसाठी बाहेरगावी गेलेल्या अभियंत्याच्या घराच्या खिडकीचे गज उचकटून कपाटात ठेवलेले दीडशे डॉलर, सोने, हिरे-मोत्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल साडे अकरा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना कर्वेनगर येथील अलंकार सोसायटीमध्ये घडली. 

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

याप्रकरणी कर्वेनगर येथील 49 वर्षीय नागरीकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अलंकार पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नारखेडे हे 18 नोव्हेंबरला त्यांच्या आणि मित्राच्या कुटुंबीयांसह बाहेरगावी सहलीसाठी गेले होते. त्यांनी जाताना घराची एक चावी त्यांच्याकडे दहा वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीकडे दिली होती. त्यांची मोलकरीण 19 नोव्हेंबरला घरी काम करुन दुपारी साडे तीन वाजता गेली, त्यानंतर ती दोन दिवसांनी शनिवारी दुपारी दीड वाजता पुन्हा फिर्यादीच्या घरी काम करण्यासाठी आली. त्यावेळी घराच्या खिडकीचे गज उचकटून घरामध्ये चोरी केल्याचे निदर्शनास आले. मोलकरणीने याबाबत फिर्यादीस माहिती दिली.

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

फिर्यादी बाहेरगावाहून परतल्यानंतर त्यांनी घरातील चोरी गेलेल्या मालाची खात्री केली. त्यावेळी फिर्यादीच्या बेडरूममधील सोने, हिरे-मोत्याचे दागिने, 27 हजार रुपयांची रोकड आणि दीडशे डॉलर असा तब्बल साडे अकरा लाख 168 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)