अन् पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास प्रवाशांनीच पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पुणे ः पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणाऱ्यास प्रवाशांनी पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्याचे तीन साथीदार गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता चंदननगर येथील खराडी बाह्यवळणावर घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विनोद शिवलाल पवार (वय 52, रा. मुंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रजोत चौसाळकर (वय 32, रा. कुर्ला, मुंबई ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौसाळकर हे मुंबईचे रहीवासी आहेत. ते त्यांच्या वैयक्तीक कामानिमित्त पत्नीसह खराडीत आले होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजता चौसाळकर व त्यांची पत्नी चंदननगर येथील बाह्यवळण बसथांब्यावर थांबले होते. त्यावेळी आलेल्या बसमध्ये ते दोघेजण चढले. बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेऊन विनोद पवार याने त्यांच्या गळ्यातील 44 हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चौसाळकर यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यावेळी अन्य प्रवाशांच्या मदतीने त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का? 

वृद्ध महिला प्रवाशाची सोन्याची बांगडी चोरली 
पीएमपीएल बसधून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिला प्रवाशाच्या हातातील 45 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरट्याने कापून नेली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजता महानगरपालिका ते वारजे माळवाडी या बसप्रवासात घडली. याप्रकरणी वृद्ध महिलेने वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief was caught by the passenger in the PMPML bus

टॅग्स