
निरगुडसर : वृद्ध महिलेला दोन दिवसापूर्वी जमिनीच्या खंडाचे पैसे मिळाल्याची पाळत राखून आंबेगाव तालुक्यातील वळती येथील काटवानवस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून एक लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवार (ता.२७) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.