esakal | उंडवडी सुपेत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीसह मॉल फोडून चोरले साहित्य
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Pune

उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे अज्ञात चोरट्यानी मंगळवारी (ता. 1) रात्री दोन ठिकाणी चोरी केली. यामध्ये येथील आकाश फर्निचर मॉलमधील साहित्य चोरुन नेले व सत्यवान गवळी यांची दुचाकी लंपास केली.

उंडवडी सुपेत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीसह मॉल फोडून चोरले साहित्य

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे अज्ञात चोरट्यानी मंगळवारी (ता. 1) रात्री दोन ठिकाणी चोरी केली. यामध्ये येथील आकाश फर्निचर मॉलमधील साहित्य चोरुन नेले व सत्यवान गवळी यांची दुचाकी लंपास केली.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बारामती - पाटस रस्त्यालगतचे आकाश फर्निचर मॉलचे अज्ञात चोरट्यानी शटर कटावनीच्या सहाय्याने उचकाटून मॉलमधील टी.व्ही, होमथिएटर, कुकर, मिक्सर, हिटर, जंबो शिगडी, चप्पल, तीनचाकी लहान सायकल तसेच रोख रक्कम पाच हजार रुपये असे एकूण अंदाजे पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला, अशी माहिती आकाश मॉल फर्निचरचे मालक प्रकाश तावरे यांनी दिली. तसेच येथील पेट्रोल पंपाशेजारील सत्यवान गणेश गवळी यांच्या घरासमोरील हिरो होंडा कंपनीची डिलक्स दुचाकी (एम. एच. 42 एम. 1596) चोरट्यांनी लंपास केली. घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मागील आठवड्यात उंडवडी कडेपठार येथेही अशा पध्दतीने चोरीचा प्रकार घडला होता. त्यानंतर तशा पधतीने येथेही चोरट्यानी कटावनीने शटर उचकटून चोरी केल्याने  संबंधित चोरटे एकच असावेत, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.