
पुणे : पुण्यात मटण पार्टी करण्यासाठी भामट्यांनी थेट दुकान फोडल्याची घटना घडली आहे. चिकन, मटण पार्टीसोबत मद्यपान करण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे चार चोरट्यांनी पुण्यातील एक दुकान फोडून तिथे असलेले पैसे चोरून पार्टी करण्याचं ठरवलं. मात्र त्यांच्या एका चुकीमुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.