Pune Crime News : बाणेर-बालेवाडी परिसरात जुन्या दुचाकींची चोरी! चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Pune Crime News : सध्या बाणेर बालेवाडी परिसरातील जुन्या (किमती) दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.
Pune Crime News
Pune Crime News

बालेवाडी, ता .1 सध्या बाणेर-बालेवाडी परिसरातील जुन्या (किमती) दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशाच दोन घटना बालेवाडी येथे लागोपाठ दोन दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत. बालेवाडी परिसरातून दोन 'यामाहा' 'आर एक्स हंड्रेड' या दुचाकी रात्री दोनच्या सुमारास चोरीस गेल्या असल्यामुळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे. सीसीटीव्हीमध्ये दुचाकी चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तीची छबी कैद झाली असून त्याने चेह-यावर मास्क लावल्यामुळे व्यक्ती ओळखू येत नाही .

बालेवाडी येथील मोजे कॉलेज परिसरात (ता.२८ मे ) रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास घराजवळच्या पार्किंगमधून 'यामाहा आर एक्स हंड्रेड ' गाडी क्रमांक एम एच झेड ३५२० चोरीस गेली आहे. या रात्री दोनच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने शेजारच्या इमारतीच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून संबंधित घराच्या पार्किंग मध्ये प्रवेश केला, त्याने गेटचे कुलूप उघडून दुचाकी चोरून नेली. यावेळी सीसीटीव्ही मध्ये चोराची छबी कैद झाली असून, या व्यक्तीने चेहऱ्यावर पूर्ण मास्क लावल्यामुळे व्यक्ती ओळखू येत नाही.

त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे (ता.३१ मे) रोजी बालेवाडी येथील 'रणभूमी' परिसरातून अजून एक यामाहा आर एक्स हंड्रेड कंपनीची दुचाकी क्रमांक (एम एस बारा,एम ४१५२ )चोरीस गेली आहे . तरी या दुचाकी चोरांचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत, जेणेकरून दुचाकी चोरणाऱ्या टोळीस आळा बसेल.

Pune Crime News
Pune Porsche Accident: संपूर्ण अग्रवाल कुटुंब कोठडीत! कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक

मला जुन्या 'यामाहा' दुचाकीची आवड असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी ही दुचाकी वापरत होतो .सध्या जुन्या' यामाहा गाड्यांना चांगली मागणी असल्यामुळे ,ही दुचाकी चोरीस गेली आहे. तरी पोलिसांनी याचा तपास लवकरात लवकर करावा ही विनंती. - अमित बर्गे, बालेवाडी .

माझी 'यामा' ३१ मे रोजी रात्री दोनच्या सुमारास घराजवळून गेली आहे. पोलिसात तक्रार दाखल केली आहे .तरी याचा तपास लवकरात लवकर करावा. परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल. - आकाश रोहिदास बालवडकर बालेवाडी

या दोन्ही गुन्हांची तक्रार नोंदविण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींचा शोध सुरू आहे. - अजय कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , चतुशृंगी पोलीस ठाणे .

Pune Crime News
Pune News: कर्वे रोडवर दुर्दैवी अपघात; क्रेनखाली येऊन सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com