कात्रज, हडपसर, मांजरीत चोरट्यांनी तिघांना लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain-Snaching

कात्रज, हडपसर, मांजरीत चोरट्यांनी तिघांना लुटले

पुणे - शहराबरोबर उपनगरात लूटमारीचे प्रकार वाढले. एकाच दिवशी कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात वेगवेगळ्या घटनेत तिघांना लुटले. कात्रज भागातील सावंत विहार सोसायटी परिसरातील पादचारी महिलेच्या हातातील ७० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.

हडपसरमध्ये प्रवाशाला मोटारचालकाने लुटले. याप्रकरणी नवनाथ झाडे (वय ३४, रा. ओंकार कॉलनी, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झाडे मध्यरात्रीच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी सोलापूर रस्त्यावर हडपसरमध्ये बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी मोटारचालक तेथे आले. कोठे निघाला, अशी विचारणा मोटारचालकाने केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना मोटारीतून मूळगावी सोडतो, असे सांगून मोटारीत बसवून चाकूच्या धाकाने रोकड, दोन मोबइल संच तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा ५६ हजार रुपयांचा ऐवज मोटारचालकाने लुटले. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

मांजरी भागात एका पादचारी तरुणाचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सुहास जाधव (वय २५, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव रात्री मांजरीतील ग्रीन सोसायटी परिसरातून जात होते. त्या वेळी चोरट्यांनी जाधव यांच्या हातातील आठ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक पोलीस निरीक्षक एम. जी. थोरात तपास करत आहेत.

Web Title: Thieves Robbed Three People In Katraj Hadapsar Manjri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top