
चोरट्यांचा कोल्हापुरी बंधाऱ्यावरील ढाप्यावरच डल्ला
निरगुडसर - आता पर्यंत शेतकऱ्यांची कृषी पंप व केबल चोरीच्या घटना होत होत्या परंतु आता चोरट्यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यावरील ढाप्यावरच डल्ला मारण्यास सुरुवात केल्यामुळे भविष्यात पाणी अडवण्याचे संकट गडद झाले आहे. ढाप्याच्या चोरीची घटना ता. 21 रोजी घडली आहे. त्यामुळे आता पाटबंधारे विभाग ही चोरी रोखणार का असा प्रश्न उपस्थित आहे.
आंबेगाव तालुक्यातील वळती-नागापूर (तागडे मळा) कोल्हापुरी बंधारा येथून जवळपास 91 ढापे चोरीस गेल्याची घटना घडली आहे. चोरीची घटना घडल्यानंतर शुक्रवार ता. 22 रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदरी निकम यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोर विनायक लोंढे, तबाजी लोखंडे, बाबाजी थोरात, संदीप भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वळती नागपूर बंधाऱ्यावरील एकूण 91 धावांची चोरी झाली असून प्रति आठ हजार रुपये प्रमाणे तब्बल ७ लाख २८ हजार रुपये चे नुकसान पाटबंधारे विभागाला झाले आहे तसेच संरक्षण कठडे म्हणून उभारलेल्या पाईपची पण चोरी झाली आहे त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यावरील सुरक्षितता प्रश्न गंभीर बनला आहे तरी पाटबंधारे विभागाने या बाबत तातडीने दखल घ्यावी तसेच चोरी गेलेले ढापे तातडीने उपलब्ध करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव खडकी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यावरील ढापे अशाच प्रकारे चोरी गेल्याची घटना घडली असून लाखो रुपयाचे नुकसान झाले. हा विषय भुरटी चोरीचा नसून मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पोलीस प्रशासन आणि संबंधित पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन ह्या आरोपींना लवकर पकडून रॅकेट चालवणारा सूत्रधार कोण ? यावर कायमस्वरूपी विषय मार्गी लावावा , अशी ग्रामस्थांची मागणी केली आहे अधिकृत सरकारी माहितीनुसार 1 ढापा ८००० रुपये म्हणजे ९१ ढापे ची किंमत ७.२८लक्ष रु. ची चोरीचा आहे, पोलिस संतोष मांडवे यांच्या घटनास्थळी पाहणीनंतर लवकरच आरोपींना अटक करू , तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून काही संशयास्पद हालचाली ची माहिती आम्हास द्यावी" असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या 3 , 4 दिवसांपूर्वी पिंपळगाव खडकी येथील घटनेची पुनरावृत्ती आज वळती नागापूर येथे घडली , मुद्दा इथेच मर्यादित नसून इथून मागे सुद्धा ढापे चोरी चे प्रकार , शेतकऱ्यांची मोटर , केबल चोरी हे प्रकार सर्रास चालू आहेत ... कायमस्वरूपी सुरक्षित यंत्रणा या असू शकते , यावर पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाने भविष्यात यंत्रणा राबवावी , CCTV सोबत काही सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते , कृषिभूषण धोंडिभाऊ भोर यांनी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम म्हणाले की, वळती नागपूर कोल्हापुरी बंधाऱ्यावर ढापे चोरीला गेल्याची घटना घडली असून या मागील काळातही चोरी झाली आहे तसेच बंधाऱ्यातील संरक्षण असलेले लोखंडी पाईप पण चोरी गेले आहे या वारंवार होणाऱ्या चोऱ्या संबंधित पाटबंधारे विभागांनी रोखव्यात तसेच पुढील काळात कोल्हापुरी बंधारे पाणी अडवण्यासाठी ढाप्याची कमतरता पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकरच पाटबंधारे विभागांनी नवीन ठाप्याची व्यवस्था करावी.