
अकरावीच्या प्रवेशाची तिसरी यादी गुरुवारी
पुणे : अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत 25 हजार 676 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातील 10 हजार 792 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अकरावी प्रवेशाची तिसरी नियमित गुणवत्ता यादी येत्या गुरुवारी (ता. 26) सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे.
पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी 75 हजार 939 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत 41 हजार 961 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यातील सुमारे 19 हजार 88 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, दुसऱ्या गुणवत्ता यादीत 25 हजार 676 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता, त्यातील 10 हजार 792 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
तपशील : संख्या
एकूण प्राप्त अर्ज : 75 हजार 939
पहिल्या गुणवत्ता यादीत झालेले प्रवेश : 19,088
दुसऱ्या यादीत प्रवेश दिलेले विद्यार्थी : 25,676
प्रथम पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी : 8,552
दुसऱ्या गुणवत्ता यादीत झालेले प्रवेश : 10,792
तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक :
तपशील : कालावधी : वेळ
- रिक्त जागांचा तपशील : 23 जुलै : सकाळी 11 वाजता
- भाग एक आणि भाग दोन भरण्यासाठी उपलब्ध : 23 आणि 24 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजता
- तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 26 जुलै : सकाळी 11 वाजता.
अकरावी प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी www.dydepune.com आणि http://pune.11thadmission.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.