मेट्रो करणार ‘थर्ड पार्टी ऑडिट’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे - मेट्रो प्रकल्पात नाशिक फाट्याजवळ नुकताच झालेला अपघात हा कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित पायलिंग रिग चालकाला कामावरून काढून टाकण्यात आले असून, कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे, अशी माहिती महामेट्रोकडून गुरुवारी देण्यात आली. तसेच, मेट्रो प्रकल्पातील कामांची सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी एका त्रयस्थ संस्थेकडून सुरक्षिततेचा अभ्यास (थर्ड पार्टी ऑडिट) करून घेणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 

पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गावर नाशिक फाट्याजवळ गेल्या आठवड्यात पायलिंग रिग कोसळली होती. या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची कारणे शोधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापकांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. यात कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच, संपूर्ण सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला आहे, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी 
सांगितले.

Web Title: Third Party Audit by Metro