

पुणे : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यातील सराईत आरोपी गुन्हेगार व पोलीस अधिकारी.
Sakal
मंचर : मंचर जवळ थोरांदळे (ता.आंबेगाव) येथे शेतकरी दामोदर जयराम मिंडे (वय ६२) यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांच्या डोक्यात लोखंडी पहार टाकून त्यांचा मंगळवारी (ता.३१मार्च ) खून करण्यात आला. सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोबाईल असा २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व मंचर पोलिसांनी समांतर तपास करून जुन्नर व पारनेर तालुक्यातील १०० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासून माबोईल लोकेशनच्या आधारे कबीर उंबऱ्या काळे (वय २४, सध्या रा.पुणेवाडी, ता.पारनेर, मुळ रा.सुरेगाव, ता.श्रीगोंदा) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्हयात वापरलेली पॅशन मोटारसायकल जप्त केली आहे.” अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिली.