esakal | अरे बापरे! पुणे जिल्ह्यात कोरोनोची आता एवढी रुग्णसंख्या...
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांनी आज (ता. ३) एक हजारांचा आकडा क्राॅस केला. यामुळे मागील १०० दिवसांत १ हजार २७ रुग्ण आढळून आले आहेत.

अरे बापरे! पुणे जिल्ह्यात कोरोनोची आता एवढी रुग्णसंख्या...

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांनी आज (ता. ३) एक हजारांचा आकडा क्राॅस केला. यामुळे मागील १०० दिवसांत १ हजार २७ रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार दररोज सरासरी दहा नवे रुग्ण ग्रामीण भागात आढळत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही आकडेवारी केवळ जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील आहे. यामध्ये नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील रुग्णांचा समावेश नाही. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४४८ रुग्ण हवेली तालुक्यातील तर, सर्वांत कमी १७ रुग्ण हे बारामती तालुक्यात आहेत. जिल्ह्यातील पहिला रुग्ण १० मार्चला हवेली तालुक्यातील मांजरी येथे सापडला होता. त्यास आज बरोबर १०० दिवस झाले आहेत. म्हणजेच  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक हजारांचा टप्पा ओलांडण्यासाठी तब्बल १०० दिवसांचा कालावधी लागला आहे. 

दरम्यान, आजपर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ५१२ जण उपचारानंतर पुर्णपणे बरे झाले आहेत. या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय २४ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ४९१ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

याव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात मिळून २८९ आणि तिन्ही कॅंटोन्मेंट बोर्डात मिळून ७६७ इतके कोरोना रुग्ण आहेत. नगरपालिका क्षेत्रातील १५ तर कॅंटोन्मेंट बोर्डातील ३४ जणांचा आज अखेरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तालुकानिहाय कोरोना रुग्ण 

- आंबेगाव ---- ५२.
- बारामती --- १७.
- भोर --- २९.
- दौंड --- ४०.
- हवेली --- ४४८.
- इंदापूर --- २०.
- जुन्नर --- ७५.
- खेड --- १०४.
- मावळ --- ६८.
- मुळशी --- ६९.
- पुरंदर --- २५.
- शिरूर --- ४४.
- वेल्हे --- ३६.
-------------------------
- एकूण ---- १०२७.