

Spiritual Fervour Marks Sankashti Chaturthi Celebrations at Theur
esakal
-सुनील जगताप
थेऊर: आज ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती.पहाटे पुजारी कीर्तिराज आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली,यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.