पुणे जिल्ह्यातून हजारो युवक सिंदखेडराजाकडे रवाना

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 11 जानेवारी 2020

पुणे जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक जिजाऊ भक्त राज्य राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अॅड सुनील बांगर याच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. ११) बुलढाण्याकडे रवाना झाले आहेत.

मंचर : राजमाता जिजाऊं यांचा जन्मोत्सव सोहळा रविवारी (ता १२) रोजी सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) येथे आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक जिजाऊ भक्त राज्य राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अॅड सुनील बांगर याच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. ११) बुलढाण्याकडे रवाना झाले आहेत.

हेही वाचा - पालकमंत्रीपदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांची गुगली 

या संदर्भात अॅड सुनील बांगर म्हणाले,"गेल्या तीस वर्षापासून पुणे जिल्ह्यातून जिजाऊ भक्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी सिंदखेड राजा येथे जातात. जिजाऊ सृष्टीवर माथा टेकून जिजाऊ माता यांचे दर्शन घेतले जाते. तेथे होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली जाते. यावेळी युवक युवती बरोबर जेष्ठ नागरिक हि उत्सवासाठी जात आहेत.

राज्य राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्यावतीने जन्मोत्सवसाठी जाणार्या कार्यकर्त्याची नियोजन केले जाते. तसेच वर्षभर महाविद्यालय व विविध कार्यक्रमात राजमाता जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कार्याच्या माहितीचा प्रचार व प्रसार केला जातो. यापुढे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या संदर्भात तज्ञाची व्याख्याने आयोजित करण्याचे नियोजन आहे. "

हेही वाचा - सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of youths from Pune district leave for Sindhkhed Raja