सलूनमध्ये शिरुन दोघांवर केले ब्लेडने वार; दिली जिवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

फिर्यादीचे शिंदेनगर येथे सलून असून रविवारी (ता. 23) आरोपी दुकानात आले. "तुझे नाव काय आहे,' असे फिर्यादीला विचारले. त्या वेळी त्यांचा मित्र मुनीर इस्माईल शेख यांनी काय झाले, असे विचारले. त्यावरून चिडलेल्या लोहकरे याने त्यांच्यावर दुकानातील ब्लेडने वार केला. तेथे असलेले राज धैर्यसिंग सोमवंशी यांनाही शिवीगाळ केली. 

पिंपरी : सलूनच्या दुकानात शिरून दोघांवर ब्लेडने वार करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जुन्या सांगवीतील शिंदेनगर येथे घडली. मोईन आझाद अली खान (वय 18, रा. आर. ए. लाइन क्वार्टर, खडकी बाजार) यांनी फिर्याद दिली. नितीन लोहकरे (रा. जुनी सांगवी) यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

फिर्यादीचे शिंदेनगर येथे सलून असून रविवारी (ता. 23) आरोपी दुकानात आले. "तुझे नाव काय आहे,' असे फिर्यादीला विचारले. त्या वेळी त्यांचा मित्र मुनीर इस्माईल शेख यांनी काय झाले, असे विचारले. त्यावरून चिडलेल्या लोहकरे याने त्यांच्यावर दुकानातील ब्लेडने वार केला. तेथे असलेले राज धैर्यसिंग सोमवंशी यांनाही शिवीगाळ केली. 

मधमाश्‍यांच्या हल्ल्यात तेरा विद्यार्थी जखमी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatens to kill attacking by blade on two people in the salon Pimpri