esakal | पती-पत्नीची हत्या करून फरार झालेले तीन आरोपी जेरबंद I Murder
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

पती-पत्नीची हत्या करून फरार झालेले तीन आरोपी जेरबंद

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (ता. आंबेगाव) - येथील स्मशानभूमी कचरा डेपोजवळ पती - पत्नी यांची हत्या करून फरार झालेले तीन आरोपी घोडेगाव पोलिसांनी तीन तासाचे आत शोध घेऊन अटक केली.

याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात संजय विकास वाघ यांनी दिली. किसन विकास वाघ (वय-४५) व पत्नी मोंढाबाई किसन वाघ (वय- ४१) दोघेही रा. घोडेगाव स्मशानभुमी कचरा डेपो येथे दि. २८ रोजी सायं. ५ वाजण्याचे पूर्वी दोन व्यक्तिंना मारहाण झाली असून रक्ताचे थारोळयात पडले असल्याचे संजय वाघ यांनी पाहिले. घोडेगाव पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलीसांनी तातडीने संबंधित व्यक्तिंना ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे नेले. डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. या बाबत तक्रारदार यांनी सांगितले की, भंगार विकलेल्या पैशाच्या वादाच्या कारणावरून मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे, जगन मुकणे सर्व रा. घोडेगाव यांनी किसन वाघ व मोंढाबाई वाघ यांना जबर मारहाण करून हत्या केले असल्याचे सांगितले.

हेही वाचा: तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने उडाली खळबळ

घोडेगाव परीसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव पोलीसांची दोन पथके तयार केली .यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सतिश डौले, किशोर वागज, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वायाळ, पोलीस हवालदार बाळासाहेब पवार, संदिप रसाळ, अविनाश कालेकर, संदिप लांडे, दत्तात्रय जढर, आतिश काळे, नामदेव ढेंगळे, भरत केदार, होमगार्ड स्वप्निल कानडे यांचे पथक तयार केले. घोडेगाव परीसरात या दोन पथकांनी रात्रीच्या वेळी शोध सुरू केला. पथकातील आतिश काळे, नामदेव ढेंगळे, भरत केदार, स्वप्निल कानडे यांना पाहताच आरोपी पळून चालले होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करून पथकाने ताब्यात घेतले.

loading image
go to top