esakal | तोतया पोलिस बनून हॉटेलमध्ये शिरले, फुकट जेवले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Three arrested for cheating by pretending as police officers in Indapur

 भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ''मदनवाडी चौफुला येथील एका लॉजमध्ये जाऊन आरोपींनी व्यवस्थापकाकडे मुक्कामासाठी रुम पाहिजे असे सांगितले. व्यवस्थापकांने रुम उपलब्ध नसल्याचे सांगताच  एकाने स्वतः राज्य उत्पादन शुक्ल विभागाचा अधिकारी तर, इतर दोघे पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. ''राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या आधिकाऱ्यांना ओखळत नाही का?'' अशी दमबाजी केली.

तोतया पोलिस बनून हॉटेलमध्ये शिरले, फुकट जेवले अन्...

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पोलिस आधिकारी असल्याचे भासवून फुकट जेवण करुन हॉटेल चालकांस दमदाटी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे. मदनवाडी चौफुला (ता.इंदापुर) येथील अशोका लॉज येथे ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी तीन आरोपींविरुध्द भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर शहाजी पवार, कुलदिप बाळकृष्ण कांबळे (रा. दोघे लाखेवाडी ता. इंदापूर जि पुणे), नवनाथ( संपुर्ण नाव माहिती नाही रा.दौंड) यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. रामण्णा चन्नकेशवा भट्ट( रा. हल्ली मदनवाडी ता.इंदापुर मुळगाव रा. येलाकुल भेटु,ता.जि. उडपी, कर्नाटक) यांनी 
हॉटेलच्यावतीने फिर्याद दाखल केली आहे. 

राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता; पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ''मदनवाडी चौफुला येथील एका लॉजमध्ये जाऊन आरोपींनी व्यवस्थापकाकडे मुक्कामासाठी रुम पाहिजे असे सांगितले. व्यवस्थापकांने रुम उपलब्ध नसल्याचे सांगताच  एकाने स्वतः राज्य उत्पादन शुक्ल विभागाचा अधिकारी तर, इतर दोघे पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. ''राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या आधिकाऱ्यांना ओखळत नाही का?'' अशी दमबाजी केली.

रायगड जिल्हा परिषदेत कोरोनाचा धुडगूस; अँटिजेन तपासणीत इतक्या जणांना लागण झाल्याचे उघड 

या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरुन तिन्ही आरोपींस अटक करण्यात आले असून आरोपीकडील गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले मोटार सायकल(एम.एच.४२ ए.एम.१५२७) जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने करीत आहेत. 

loading image