esakal | Big Breaking : पुण्यात सहाव्या लॉकडाउनची घोषणा; वाचा काय सुरू? काय बंद?
sakal

बोलून बातमी शोधा

pune sixth lockdown announcement municipal corporation

लॉकडाउन लागू करीत असतानाच रस्ते आणि चौकांमध्ये बॅरिकडेस उभारले जाणार आहेत. त्यासाठी रविवारी दुपारपासून पोलिसांनी रस्ते आणि चौक बंद केले आहेत.

Big Breaking : पुण्यात सहाव्या लॉकडाउनची घोषणा; वाचा काय सुरू? काय बंद?

sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

पुणे  : लॉकडाउनमध्ये पुणेकरांना रोज दूध आणि औषधांसह आरोग्य सेवा उपलब्ध राहणार आहे. मात्र, भाजीसह सर्व किरणा दुकाने 14 ते 18 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर म्हणजे 19 जुलैनंतर सकाळी आठ ते दुपारी या वेळेत किराणा दुकाने उघडणार आहेत. ऑनलाइन खाद्यपदार्थांची विक्रीही बंद राहणार आहे. सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे बंद राहील. उद्याने, मैदानांसह ‘मार्निंग वॉक'वरही बंदी घातली आहे. हॉटेल, बार, लॉज, मॉलही टाळे उघडले जाणार नाही. मात्र, 23 जुलैनंतरही रुग्ण वाढल्यास दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊनचा मुक्कमा वाढण्याचीही भीती आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त नागरिकांना रस्त्यांवर उतरता येणार नाही; तरीही घराबाहेर आल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई होईल, हेही स्पष्ट केले आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी पुण्यात सहाव्या लॉकडाउनची घोषणा केली असून, त्यानुसार सोमवारी (ता.13) मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी होईल. तेव्हा, पुणेकरांना कोणत्या सुविधा मिळणार? याचा आदेश नवे महापालिका आयुक्त कुमार यांनी रविवारी काढला. त्यात अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत.  

आणखी वाचा - पुण्याच चहा पेक्षा किटली गरम, पोलिसांनी अडवले रस्ते

... तर पोलिस कारवाई करणार
लॉकडाउन लागू करीत असतानाच रस्ते आणि चौकांमध्ये बॅरिकडेस उभारले जाणार आहेत. त्यासाठी रविवारी दुपारपासून पोलिसांनी रस्ते आणि चौक बंद केले आहेत. मात्र, विनाकारण रस्त्यांवर उतरणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई राहणार आहे. तसेच, महापालिका आणि जिल्हा प्रशासानाच्या अत्यावश्‍यक सेवांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यास परवानगी असेल. त्यामुळे या सेवा पूर्ववत राहणार आहेत.

वर्तमानपत्र सुरू राहणार
लॉकडानमध्ये वर्तमानपत्र आणि त्याचे वितरण सुरू राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना वर्तनमानपत्र मिळणार आहे. परंतु, विक्रेत्यांनी स्वत:सह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वर्तमानपत्र हाताळणीतून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

आणखी वाचा - पुणेकरांनो उद्या दुकानं खुली राहणार...पण

कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउनमधून केलेल्या उपायांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. परंतु, या काळात पुणेकरांची गैरसोय होऊ नये, याकरिता रोज आवश्‍यक तेवढ्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे घराबाहेर न येता नागरिकांनी सहकार्य करावे. परिस्थिती लक्षात घेऊन 19 जुलैनंतर काही बदलही केले जातील.
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

loading image
go to top