पुणे - शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांच्या कारवरील गोळीबार प्रकरणात वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक केलेले तिघे जण घारे यांच्या ओळखीचे आहेत. पोलिस संरक्षण, तसेच शस्त्र परवाना मिळवण्यासाठी घारे यांनी बनाव रचल्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.