पुणे - पोलिसांनी मार्केट यार्ड आणि विमाननगर भागात छापेमारी करीत २५ लाख ५१ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन, गांजा अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली..पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्यासह पथक शुक्रवारी (ता. ३१) गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस अंमलदार चेतन गायकवाड यांना मेफेड्रोन तस्करीची माहिती मिळाली..त्यानुसार या पथकाने लोहगाव-वाघोली रस्ता परिसरातून कुमेल महम्मद तांबोळी (वय २८, रा. धानोरी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १९ लाख १७ हजार रुपयांचे ८३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.विमाननगर भागात मेफेड्रोन तस्करीच्या प्रकरणात किरण भाऊसाहेब तुजारे (वय २४, रा. आव्हाळवाडी, वाघोली) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा लाख २७ हजार रुपयांचे ३० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पोलिस कर्मचारी संदीप शिर्के यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली..तसेच, आनंदनगर-बिबवेवाडी रस्त्यावर सैफन ऊर्फ शफीक इस्माईल शेख (वय ५२, रा. आनंदनगर) याच्याकडून सात हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी अजीम शेख यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. याबाबत मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.