
लासुर्णे (ता. इंदापूर) जवळील चिखलीफाटा येथून अपघातील ज्येष्ठ नागरिक रुग्णाला दवाखान्यात नेण्याचा बहाणा करुन लुटणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी शिताफितीने अटक केली.
वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) जवळील चिखलीफाटा येथून अपघातील ज्येष्ठ नागरिक रुग्णाला दवाखान्यात नेण्याचा बहाणा करुन लुटणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी शिताफितीने अटक केली. इंदापूरच्या न्यायालयाने तिघांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याप्रकरणी पोलिसांनी तेजस बाळासाहेब बच्छाव (वय २१), ऋषिकेश सुनिल चंदनशिव (वय १९), अभिजित राजेंद्र जाधव (वय १९ रा.सर्वजण,बारामती) अटक केली आहे. याप्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलाचा ही समावेश असून पोलिसांनी संबधित मुलाला ताब्यात घेवून नातेवाईकांकडे सोपविले. तिघांना इंदापूर न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार १२ नोंव्हेबर रोजी सतिश बबनराव टंकसाळे (वय ६४, रा. बारामती) हे कामानिमित्त अंथुर्णे गावामध्ये आले होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काम आटोपून सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास बारामतीकडे जात असताना लासुर्णे जवळील चिखलीफाटा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला. टंकसाळे गाडीवरुन खाली पडले. याचवेळी वरील तिघे व एक अल्पवयीन मुलगा असे चौघे दुचाकीवरुन बारामतीकडे चालले होते.
टंकसाळे यांना रस्त्यावरुन उठवून दवाखान्यामध्ये नेण्याचा बहाणा करुन आडबाजूला कालव्याच्या जवळ नेले. व दमदाटी करुन हातातील १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ८ हजार रुपयांचा मोबाईल व सातशे रुपये रोख रक्कम,पाकिट असा हजार २३ हजार ७५० रुपयांचा ऐवज काढून घेतला.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर अपहरण व जबरी चोराचा गुन्हा दाखल करुन तपास करुन आरोपींना अटक केली. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर मुंडे करीत आहेत.
(संपादन : सागर डी. शेलार)