esakal | घरफोडी करणारी टोळी लोणी पोलिसांकडून जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : घरफोडी करणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सत्तरहून अधिक जबरी घऱफोडीचे गुन्हे नावावर असणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (ता. २४) अटक केली आहे. जयसिंग काळुसिंग जुनी (वय २८, बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर), सोमनाथ नामदेव घारूळे (वय 26, रा. उरुळी देवाची ता. हवेली ) व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (वय २४ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर) ही त्या अटक केलेल्या गुन्हेगारांची आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत वरील तिघांनी सहा घऱफोड्यांची माहिती दिली असुन, पोलिसांनी वरील तिघांच्याकडुन ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक एलईडी. टिव्ही, एक डि.व्ही आर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार आणि एक मोटार सायकल असा एकूण सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान विशेषबाब म्हणजे यातील अट्टल गुन्हेगार बल्लुसिंग टाक याने पोलिसांची अटक टाळण्यासाठी ब्लेडच्या साह्याने स्वतःच्या अंगावर वार करुन करुन घेतले होते. मात्र पोलिसांनी जखमी अवस्थेमधील बल्लुसिंग टाक व त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने, वरील तिघांच्याकडुन लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ३८ टक्के नागरिकांचे लसीकरण

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दिड महिण्यापुर्वी सूर्यकांत चिंचुरे नातेवाईकासह प्रवास करीत असताना, सॅन्ट्रो कारमधून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून सूर्यकांत चिंचुरे यांना मारहाण केली होती. तसेच सूर्यकांत चिंचुरे यांच्याकडील दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले होते. तर त्याचदिवसी मंतरवाडी व हांडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोन घऱांचे दरवाजे उचकटून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने न एक मोटारसायकल चोरुन नेली होती. वरील तीनही प्रकरणे गंभीर असल्याने, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वरील प्रकरणाचा तातडीने तपास लावण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या. दरम्यान साहय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर व त्यांचे सहकारी आठ दिवसांपुर्वी वडकी गावच्या हद्दीत गस्त घालत असताना, अट्टल गुन्हेगार बल्लुसिंग टाक हा मोटारसायकलवरुन डोंगरात फीरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे राजु महानोर, पोलिस कर्मचारी अमित साळुंके, बाजीराव वीर, निखील पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बल्लुसिंग टाक याचा पाठलाग करण्यास सुरवात केली. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच, बल्लुसिंग टाक याने डोंगरांच्या दिशेने मोटारसायकलवरुन पळण्यास सुरुवात केली. डोंगरातून मोटारसायकल जात नसल्याचे लक्षात येताच, डोंगराच्या पायथ्याला मोटारसायकल टाकुन पळण्यास सुरवात केली. त्याही स्थितीत पोलिस टाक याच्या जवळ पोचताच, टाक याने स्वतःजवळील ब्लेडच्या साहय्याने स्वतःच्या अंगावर ठिकठिकाणी अंगावर वार करुन घेतले. यावर पोलिसांनी टाक यास ताब्यात घेऊन, त्याची रवानगी पुढील उपचारासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात केली. त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी टाक याची तपासणी केली असता, टाकच्या अंगावर नव्वदहून अधिक वार असल्याचे आढळून आले.

एकीकडे बल्लुसिंग टाक याच्यावर पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार चालु असतानाच, दुसरीकडे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी बल्लुसिंग टाक याच्या सहकाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांना बल्लुसिंग टाक याच्यासह जयसिंग जुनी व सोमनाथ घारूळे हे तिघेजण सॅन्ट्रो कारमधुन हडपसर- सासवड मार्गावर प्रवाशांना लुटत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उरुळी देवाची हद्दीत साफळा रचुन जयसिंग जुनी व सोमनाथ घारूळे या दोघांना सोमवारी (था. 24) रात्री अटक केली. या तिघांना एकत्र करुन, अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. यात वरील तिघांनी उरुळी ग्रामपंचायत हद्दीत दिड महिण्यापुर्वी सूर्यकांत चिंचुरे याना मारहाण करुन लुटण्याबरोबरच, आणखी पाच घऱफोड्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच वरील गुन्हातील मुद्देमालही पोलि्सांच्या ताब्यात दिला.

हेही वाचा: पुणे शहरातील नदीकाठ विकासासाठी जगातील शहरांचा अभ्यास

78 घऱफोडीचे गुन्हे दाखल-याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोरच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, बल्लुसिंग प्रभुसिंग टाक व त्याच्या वरील दोन सहकाऱ्यांच्यावर लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 78 घऱफोडीचे गुन्हे दाखल आहेत. यातील बल्लुसिंग टाक हा अट्टल गुन्हेगार असुन, त्याच्या एकट्यावर 65 घऱफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर जयसिंग जुनी याच्यावर अकरा तर व सोमनाथ घारूळे याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. वरील तिघेही अट्टल गुन्हेगार असुन, वरील तिघांच्याकडुन आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येतील.

हेही वाचा: पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम