रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर यशस्वी मात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील २९ वर्षीय युवक, त्याची पत्नी व एक मित्र या तिघांनी कोरोनावर उपचार घेतल्यानंतर यशस्वी मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सातव यांनी दिली.

तळेगाव ढमढेरे (पुणे) : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील २९ वर्षीय युवक, त्याची पत्नी व एक मित्र या तिघांनी कोरोनावर उपचार घेतल्यानंतर यशस्वी मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सातव यांनी दिली. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रांजणगाव गणपती गावात २५ जून रोजी एका २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली होती त्याच्यावर पुणे येथील  हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. तशेच त्याची पत्नी व एका मित्रालाही कोरोनाची बाधा झाली होती. या दोघांनीही कोरोनावर उपचार घेऊन विजय मिळविला असून, त्यांनाही घरी सोडण्यात आले आहे. रांजणगाव येथील पहिले तीनही रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी आल्याने ग्रामस्थ व प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
-------------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदानात उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा
-------------
रांजणगावातील गेल्या आठवड्यात सापडलेला एकजण व चालू आठवड्यात सोमवारी (ता.६) सापडलेला आणखी एक असे एकूण दोन कोरोनाबाधित रुग्ण  कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती डॉ. सातव यांनी दिली. 

दरम्यान, रांजणगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रतिबंधित व बफर क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले असून, गावातील लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. कोरोनाचा ससर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three corona Patients recover in Ranjangaon Ganpati