esakal | पुणे महापालिकेकडून तीनशे बेड्सची सोय; मात्र ऑक्सिजनअभावी सोय थांबली

बोलून बातमी शोधा

Pune Municipal
पुणे महापालिकेकडून तीनशे बेड्सची सोय; मात्र ऑक्सिजनअभावी सोय थांबली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - श्‍वास घेण्यास त्रास होणाऱ्या म्हणजे, ऑक्सिजनच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी आणखी तीनशे बेडची सोय महपालिकेने केली; त्यासाठीचे बेडही मांडल्या गेल्या; पण त्यासाठी ऑक्सिजन मिळण्याची खात्री नसल्याने बेडचा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. रुग्ण संख्या आणि तातडीच्या उपचाराची गरज पाहता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे महपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पत्रकारांना सांगितले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नव्या रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात येत आहेत. त्यातून बिबवेवाडीतील ‘ई. एस. आय’चे हॉस्पिटल, जम्बो हॉस्पिटल, गणेश कला क्रीडा मंच, खराडीतील पठारे मैदान या ठिकाणी तीनशे बेड वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारी केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असलेली ऑक्सिजनची टंचाई अजूनही कायम आहे. सध्या रुग्णालयांना अपुरा पुरवठा होत असल्याने आरोग्य यंत्रणांपुढे अडचणी आल्या आहेत. त्यामुळे नव्याने उभारलेल्या जाणाऱ्या कोविड सेंटर आणि काही रुग्णालयांत बेडचा विस्तार करता येत नाही.

हेही वाचा: विरंगुळा हरवल्याने ज्येष्ठांची होतेय घुसमट

नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकरला गळती होऊन रुग्णांचा

जीव गेल्यानंतर पुणे महापालिकेनेही खबरदारी घेतली आहे. रुग्णालयांत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनाने सरकारी आणि खासगी रुग्णालयांना केली आहे. तसेच, ऑक्सिजन साठवण्याची, पुरवठा करण्याची यंत्रणा आणि घटका सुरक्षित आहेत, याचे तज्ज्ञांकडून ‘ऑडिट’ करण्याचा आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काढला आहे. यंत्रणेचा अहवाल महापालिकेला सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.