esakal | विरंगुळा हरवल्याने ज्येष्ठांची होतेय घुसमट
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizen

विरंगुळा हरवल्याने ज्येष्ठांची होतेय घुसमट

sakal_logo
By
टीम सकाळ

बालेवाडी : कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे लहान मुले व जेष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही. त्यातच शहरातील ज्येष्ठ नागरिक मंडळ, विरंगुळा केंद्र ही वर्षभरापासून बंद आहेत. मित्रांबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी करता येत नाही, घराबाहेर पडून मोकळा श्वास घेता येत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे घरात घुसमट होते आहे.

''गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर पूर्ण जगभरात सुरू आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेला कोरोना डिसेंबरमध्ये काहीअंशी कमी झाला,तेव्हा सर्व पूवत होईल'' अशी आशा असतानाच पुन्हा फेब्रुवारीमध्ये रुग्ण संख्या जोमाने वाढू लागली, त्यामुळे पूर्ण वर्षभर जेष्ठ नागरिक घरातच आहेत. कोरोनाचा धोका हा सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जास्त आहे, तसेच यांना कोरोनाचा त्रास होऊ नये यासाठी घरातील मंडळी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत आहे, त्यांना घरातून बाहेर पडू देत नाहीत. पण त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये एकाकीपणाची भावना निर्माण होत आहे.

हेही वाचा: कोविशिल्ड लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पुणे शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्र, हास्यक्लब आहेत ज्या ठिकाणी ही मंडळी सकाळी संध्याकाळी काही वेळ का होईना एकत्र येत,गप्पागोष्टी करत किंवा आपले सुखदुःख एकमेकांशी बोलत असत पण सध्या कोरोनामुळे या सगळ्यांनाच कुलूप लागले आहे.त्यातच घरात सुन, मुलगा असतात दिवसभर त्यांना ऑफिसचे काम असल्यामुळे ते एका खोलीमध्ये बंद असतात. त्यामुळे घरात असूनही नसल्यासारखच असत. त्यातच टीव्ही सुरू केला की सतत कोरोनाने एवढे रुग्ण दगावले अशा स्वरूपाच्या बातम्या ऐकायला मिळतात. आपल्या बरोबरची अनेक मित्रमंडळी कोरोनाच्या साथीत गेल्याच्या बातम्या कानावर पडत असतात. त्यामुळे अजूनच एकटेपणा जाणवतो, तसेच करणामुळे रुग्ण वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेड मिळत नाही अशा स्वरूपाच्या बातम्या ऐकून तर आपली स्थिती अशीच होईल का? असा विचार करून तर रात्र रात्र झोप लागत नसल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.हा कोरोना कधी संपेल आणि कधी सर्व पूर्ववत याची वाट सर्वच नागरिक बघत आहेत.

हेही वाचा: पुण्यात पोलिस, महसूल प्रशासन ऑक्सिजन प्रकल्पावर करडी नजर ठेवून

'' कोरोनामुळे सगळे जग थांबले आहे. सतत घरात राहिल्यामुळे नैराश्यही येते हे जरी खरे असले तरी हे नैराश्य घालविण्यासाठी आपण घरातील नातवंडां बरोबर भरपूर वेळ घालवला पाहिजे. त्यांच्याबरोबर काही बैठे खेळ खेळू शकतो,आवडणारी पुस्तके वाचली की मनात आलेली एकाकीपणाची भावना निघून जायला मदत होते.''

- दत्ताजीराव बर्गे,ज्येष्ठ नागरिक

''बाणेर येथे आमचा निरामय हास्यक्लब आहे. गेल्या वर्षभरापासून क्लब बंद आहे. घरात राहिल्यामुळे खूप एकाकी वाटते आणि ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टीचा अतिशय मानसिक त्रास जाणवतो आहे. यासाठी आमच्या क्लब कडून ऑनलाईन पद्धतीने एकमेकांशी गप्पा मारणे, योगासने करणे,विविध सण ऑनलाइन साजरे करणे, शब्दकोडे यांसारख्या गोष्टी करून घेतल्या जातात यामुळे वेळ जाण्यास मदत होते.''

- प्रकाश चव्हाण

loading image