धक्कादायक, पुरंदरमध्ये चोवीस तासांत चार जणांचा कोरोनाने मृत्यू 

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 16 जुलै 2020

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग इतका वाढला की, अल्पावधीत पुरंदर तालुका त्रिशतकाच्या उंबरठ्यावर आणि सासवड पावणेदोनशेवर पोचले आहे,

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग इतका वाढला की, अल्पावधीत पुरंदर तालुका त्रिशतकाच्या उंबरठ्यावर आणि सासवड पावणेदोनशेवर पोचले आहे, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी दिली.   

असा चेक करा बारावीचा रिझल्ट

कालच्या दिवसात सासवडला एक महिला व एका व्यापाऱ्यासह दोन बाधीतांचे मृत्यू झाले. जेजुरीच्या एका मृताची आज नोंद व आज सकाळी सोनोरी मृताचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. म्हणजे चोवीस तासांत चार बळी झाले. त्यातून तालुक्यातील बळींचा आकडा 12 झाला व चिंता वाढली. 

आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला

सासवड शहरात आज दहा रुग्ण वाढून शहर आज 175 वर पोचले. पुरंदर तालुक्यात आज तब्बल 22 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निष्पन्न होऊन तालुका 297 वर पोचला. आज सासवड दहा रुग्णांसह हिवरे तीन, सोनोरी पाच, कुंभारवळण व भिवडी प्रत्येकी एक, असे रुग्ण आढळून आले. बाधीतांचे मृत्यू मात्र हादरवून टाकणारे ठरत आहेत.

कोविड सेंटर व रुग्णालय विस्ताराकडे लक्ष
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या दौऱ्याने सासवड व जेजुरी आणि इतर ठिकाणी वाढीव कोविड केअर सेंटरसह त्याची क्षमता त्वरित वाढविण्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, शेकडो बेडची व्यवस्था असणारे कोविड उपचार रुग्णालय कधी होणार, याकडे वाढत्या रुग्ण संख्येने लक्ष लागले आहे.
 
Edited By : Nilesh J shende
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred patients of Corona in Purandar taluka