
कोंढवा : कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील सर्वात मोठी सोसायटी म्हणून ओळख असलेल्या थ्री-ज्वेल्स सोसायटीत ४०० किलोवॅटचा सौरउर्जा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सोसायटी सभासदांनी संजय मुळे व रुपेश शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवत मागील सहा महिन्यांपासून प्रकल्पाच्या प्राथमिक गोष्टींसाठी प्रयत्न केले. विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले.