ताम्हिणी घाटामधील अपघातात तीन जण ठार

Accident
Accident
Updated on

पिंपरी - चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव मोटार झाडाला धडकून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहेत. मृत व जखमी पिंपरी चिंचवडमधील बोपखेल येथील रहिवासी आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेसर गावाजवळ घडली.

निखिल ऊर्फ सोन्या चंद्रकांत घुले (वय २६), चंद्रकांत श्रीकांत निकम (वय २८), विक्रम बलजीत सिंग (वय ३१) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमीमध्ये विजय गोरखनाथ पाटील (वय २३), सुनील बाळाजी तेलंगे (वय २७, सर्व रा. गणेशनगर, बोपखेल, पिंपरी-चिंचवड) यांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. बुधवारी (ता. १९) रात्री हे पाचही जण बोपखेलमधून मोटारीतून दिवे आगारला जाण्यासाठी निघाले. गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची मोटार ताम्हिणी घाटात असताना चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार अवघड वळणावरील झाडाला धडकली. निखिल, चंद्रकांत, आणि विक्रम यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय आणि सुनील जखमी झाले. जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ramdara Shrine Closed for Devotees as Renovation and Safety Work Gets Underway
Healthcare or Monopoly? Pune Hospitals Accused of Violating Patients’ Rights
Blood That Connects Lives: Pune Donors Set an Example of Selfless Service
Daily Travel Turns Into Ordeal for Thousands on Daund-Pune DEMU Route
Marathi News Esakal
www.esakal.com