Three Death in Eco Car
sakal
मंचर - आंबेगाव तालुक्यात मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. ११) दुपारी झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर- मोरडेवाडी (ता. आंबेगाव) येथे इको मोटारीचा अपघात झाला, तर नारायणगाव-जाधववाडी अष्टविनायक महामार्गावर मोटारसायकलला स्विफ्ट मोटारीने धडक दिल्याने दुसरा अपघात झाला.