बाहेरगावी गेलेल्या वृद्धाच्या घरातील 3 लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

पुणे : बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील तब्बल तीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 5 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत नवी पेठेतील राजेंद्रनगर येथे घडली. याप्रकरणी दिपक कुलकर्णी (वय 70, रा. नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवी पेठेतील राजेंद्रनगर येथील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये राहतात. फिर्यादी कुलकर्णी हे 5 ते 8 या कालावधीत बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सदनिकेच्या बेडरुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने व अन्य वस्तू असा तब्बल तीन लाख रूपयांचा ऐवज चोरुन नेला. फिर्यादी घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यसाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three lakh theft from senior citizens in house