Organ Donation : पतीच्या अवयव दानाचा निर्णयातून वाचविले तीन प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three lives saved husband organ donation human life health doctor pune

Organ Donation : पतीच्या अवयव दानाचा निर्णयातून वाचविले तीन प्राण

पुणे : मजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या अवघ्या चोवीस वर्षांच्या तिच्या पतीचा रस्त्यावर अपघात झाला. त्या घरातील कमावणारा एकमेव माणूस. अपघातात डोक्याला जबरी मार बसल्याने तोच मृत्यूशैय्येवर पडलेला. इतक्यात डॉक्टरांनी त्याच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे पत्नीला सांगितले. तिच्यावर आभाळ कोसळलं. दोन छोटी मुलं पदरात असलेल्या त्या पत्नीने मेंदूचे कार्य थांबलेल्या पतीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांचे प्राण वाचले.

खेड राजगुरुनगर तालुक्यातील दोंदे गावात रहणारं ते साधं कुटुंब. त्यात पत्नी, दोन लहान मुले आणि आई-वडील असा त्याचा परिवार. पण, त्या कुटुंबातील कर्त्या तरुणाचा रस्त्यावर अपघात झाला. त्याच्या डोक्याचा गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारांसाठी 8 डिसेंबरला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे प्राण वचाविण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, अपघात इतका गंभीर होता की, त्याचा उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचे हृदय सुरू होते पण, त्याच्या मेंदूचे कार्य थांबले. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाला ‘ब्रेन डेड’ जाहीर केले. संकटाचं आभाळ तिच्या वेळी कोसळले होते. त्या वेळी रुग्णाच्या पत्नीला ससून रुग्णालयातील वैद्यकीय समाज सेवकांनी रुग्णाच्या मरणोत्तर अवयव दानाचे आवाहन केले. त्याचे महत्त्व सांगितले. त्यामुळे अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही त्या पत्नीने मेंदूचे कार्य थांबलेल्या पतीच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यातून मूत्रपिंड आणि यकृताचे आजार असलेल्या आणि या अवयवांच्या प्रतीक्षेतील तीन रुग्णांचे प्राण त्या पत्नीने वाचविले.

या बद्दल माहिती देताना ‘झोनल ट्रान्सप्लँट को-ऑर्डिनेशन कमिटी’च्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, “अवयव दानाच्या धोरणानुसार दान केलेले यकृत रूबी हॉल क्लिनिकमध्ये प्रतिक्षा यादीवर असणाऱ्या 66 वर्षांच्या रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. तर, एक मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील 35 महिला रुग्णाला आणि दुसरे नाशिक येथील अपोलो रुग्णालयातील 50 वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपण केले. पुणे ‘झेडटीसीसी’मध्ये झालेले या वर्षातील हे 45वे अवयव दान ठरले.”

ससून रुग्णालयात कोरोनानंतरचे पहिले अवयव दान

कोरोना उद्रेकानंतर ससून रुग्णालयातील अवयव दान थांबले होते. मार्च 2020 नंतर डिसेंबर 2022 ला पहिले अवयव दान झाले. ससून रुग्णालयात नोव्हेंबर 2016 मध्ये पहिले अवयव दान झाले होते. आतापर्यंत ससून रुग्णालयात 12 अवयव दान झाले आहेत. त्यातून वेगवेगळे 58 अवयव दान करण्यात आले. तसेच

ससून रुग्णालयातील अवयव दान

हृदय 5

यकृत 10

मूत्रपिंड 18

नेत्र 22