accident in morgaon
accident in morgaonsakal

बारामती : उसाच्या ट्रॉलीला गाडीची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

अपघातात एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारार्थ पुण्याला हलविण्यात आले आहे.
Summary

बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी, मुलगा आणि बहिण असे तिघेही या अपघातात मृत्यूमुखी पडले. तर एक महिला गंभीर जखमी आहे.

बारामती : उसाच्या ट्रॉलीला( tractor trolley) पाठीमागून चारचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी अंत झाला. मंगळवारी (ता. 18) रात्री दहाच्या सुमारास तरडोलीनजिक हा अपघात झाला. या अपघातात बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहिण आणि बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारार्थ पुण्याला हलविण्यात आले आहे. (accident news imn baramati morgaon)

accident in morgaon
भाजप नेतृत्वाने तिकीट वाटपाचे बदलले निकष

एका धार्मिक कार्यक्रमासाठी हे सर्व जण पुण्याला गेले होते. रात्री कार्यक्रम संपवून बारामतीला निघालेले असताना तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा (tractor trolley) अंदाज न आल्याने मागून गाडी धडकून हा अपघात झाल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे. गाडीची धडक जोरदार होती, त्या मुळे तिघांचा मृत्यू झाला(death) असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अत्यंत धार्मिक स्वभावाच्या म्हणून अश्विनी भंडारी व कविता कळसकर यांची ओळख होती. तर मिलिंद भंडारी हेही मितभाषी व संयमी स्वभावाचे होते. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघाताची तीव्रता(accident news) पाहून अनेक जण हळहळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com