esakal | बारामतीकरांनो काळजी घ्या, कोरोना शतकाच्या उंबरठ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामतीत आज तीन जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 82 वर जाऊन पोहोचली असून, त्यापैकी 32 जण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

बारामतीकरांनो काळजी घ्या, कोरोना शतकाच्या उंबरठ्यावर

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामतीत आज तीन जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 82 वर जाऊन पोहोचली असून, त्यापैकी 32 जण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्यालयच बंद..कारण..

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारपर्यंत पाठवलेल्या 53 स्वॅब नमुन्यांपैकी 50 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, मात्र गुनवडी येथील 64 वर्षांच्या ग्रामस्थासह कुरणेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष व कण्हेरी येथील 44 वर्षांच्या महिलेचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. कुरणेवाडी व कण्हेरी येथील रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, गुनवडी येथील ज्या रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यांचा तसेच भिकोबानगर येथील रुग्णाचाही काल रात्री उशीरा मृत्यू झाला. या दोघांनाही त्रास जाणवत होता. या दोघांचाही मृत्यू बारामतीच्या रुई रुग्णालयात झाला आहे.